बेळगावला जाताय माहिती असून द्या...लालपरीची वाहतूक बंद 

st bus
st bus

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पुतळा दहन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेळगाव येथे आंदोलन सुरु केले आहे. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. 28) रात्रीपासून बेळगावला जाणारी लालपरीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. बेळगावला जाणाऱ्या महाराष्ट्रातील 109 बस तर बेळगावातून महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटक बसची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या पार्श्‍वभूमीवर बेळगाव व कोल्हापूर येथील पोलिस अधिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. 


उसदर आंदोलन, आरक्षण अथवा विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाच्या बसला टार्गेट केले जाते. मागील तीन वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे एक हजार 700 बसची तोडफोड विविध आंदोलनात झाली आहे. त्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाला 100 कोटींपर्यंत भूर्दंड सोसावा लागला आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता व राज्य परिवहन महामंडळाला होणारे नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने बेळगाव येथील वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक राहूल तोरो यांनी सकाळ शी बोलताना सांगितले. पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या आदेशानुसारच वाहतूक सुरु होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतरच वाहतूक सुरु होईल 
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी बेळगाव येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही तरुणांनी त्याठिकाणी आंदोलन सुरु केल्याने सुरक्षिततेची खबरदारी म्हणून बेळगाव व कोल्हापूर पोलिस अधीक्षकांच्या निर्णयानुसार राज्य परिवहन महामंडळाची त्या मार्गावरील वाहतूक ठप्प ठेवण्यात आली आहे. 
- राहूल तोरो, वाहतूक व्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळ 


ठळक बाबी... 

  • बेळगावातील आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाची सेवा शनिवारी रात्रीपासून बंद 
  • कोल्हापूर व बेळगाव पोलिस अधिक्षकांनी राज्य परिवहन महामंडळाला कळविला निर्णय 
  • सोलापूर, कोल्हापूरसह राज्यातील अन्य स्थानकांमधून बेळगावमार्गे जाणाऱ्या 109 बस रद्द 
  • आंदोलनात प्रवाशांची सुरक्षितता राहावी, एसटी बसचे नुकसान टाळण्यासाठी वाहतूक बंद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com