Sangli News :किल्लेमच्छिंद्रगड पर्यटन स्थळावरील 'माहिती फलक' दारुड्यांनी केले गायब

"कुणी कितीही त्रास दिला तरी मी माझा मुलगा शहीद प्रशांत पाटील याची आठवण म्हणून किल्लेमच्छिंद्रगड पर्यटनस्थळ हरित करणारच.
Information board at Machindragad 
 tourist spot stolen by drink persons sangli
Information board at Machindragad tourist spot stolen by drink persons sanglisakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड : शहीद प्रशांत पाटील यांच्या कुटुंबीयांनी किल्लेमच्छिंद्रगड ता. वाळवा) येथील पर्यटन स्थळाच्या शंभर एकर क्षेत्रावर वृक्षलागवड करून पर्यटन क्षेत्र हरीत करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. पर्यटन क्षेत्र हरीत होत असतान मात्र काही लोकांच्या पोटात पोटशुळ उठण्यास सुरवात झाली आहे.

वृक्ष लागवडीच्या ठिकाणी पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणारी माहिती लोकांना समजावी यासाठी तयार केलेल्या माहिती फलकाच्या दोन लोखंडी अँगलसह तयार केलेल्या फ्रेम दारुड्यांनी कापून नेण्याचा प्रकार घडला आहे. सन २०१२-१३ मध्ये सुरवातीस १२०० झाडे स्वखर्चाने लावून शहिद प्रशांत पाटील यांच्या परीवाराने पर्यटनस्थळी वृक्षलागवड केली.

वर्षभर रोपांची जोपासना केल्यानंतर तत्कालीन उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुचिता भिकाने यांनी कामाची दखल घेवून रोहयो'तुन कामासाठी मदतीला सहा मजूर दिले. अधून मधून मस्टर निघत असल्याने बराचसा खर्चिक भाग पाटील कुटुंबियांनी सोसला.

योजनेतील त्रासीक अटींना वैतागून सन २०१९ मध्ये शहिद प्रशांत पाटील यांच्या मातोश्री राजाक्का पाटील, मामा शिवकुमार पाटील यांनी स्वखर्चाने पुन्हा नव्याने १५०० झाडे लावली. त्यातही राजकारण आड आले. वृक्षसंगोपनासाठी दिलेले पाणी कनेक्शन बंद केले गेले. ते सुरू करण्यासाठी प्रशासनाने तब्बल तीन वर्षे घेतली. लावलेल्या झाडापैकी ४० टक्के तसेच तयार केलेली दीडहजार रोपे पाण्याअभावी नष्ट झाली.

पाच वर्षाचा काळ लोटल्यानंतर गतवर्षी १४०० रोपे रोहयो'तुन लावण्यात आली याकामीही प्रशांतच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला. गावास पाण्याची टंचाई आहे. या कारणास्तव पाणी उपलब्ध झाले नाही. काम बंद पडले. काही रोपे गुराख्यांनी उपटून टाकली. तर उर्वरित ४० टक्के रोपेही पाऊस न पडल्याने पाण्याअभावी शेवटची घटका मोजू लागलीत.

अशा परिस्थितीत चालु वर्षी शासनाचा एकही रुपया न घेता नव्याने रोपांची लावण करून ती जगविण्यासाठी इलेक्ट्रिक पंपाद्वारे डोंगरावर पाणी नेऊन प्रशांतचे कुटुंबिय झाडे जगविण्यासाठी प्रयत्नशील असताना काही समाजकंटक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचा प्रयत्य यावर्षीच्या १५ ऑगष्टच्या ग्रामसभेत आला, दोन महाभागानी दारु पिऊन वृक्षलागवड करायची नाही असा गलका केला. त्याचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यातच आहे.

प्रशांतचे कुटुंबिय गेली दहा वर्षे पर्यटन स्थळ हरित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यासाठी वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे काढण्याची मजुरी, वृक्षरोपाची खरेदी, संगोपन मजुरी खर्चाची रक्कम स्वकमाईतून करीत आहेत.

तथापि गेल्या दहा वर्षात समाज कंटकानी वृक्षलागवड क्षेत्रास आग लावणे, पाण्यासाठी तयार केलेली पाईप लाईनसह ठिबक योजना पेटवून देणे, गुराख्याकरवी रोपे नष्ट करणे असे प्रकार घडवून आणून शहीद प्रशांत पाटील यांच्या कुंटुंबियांचे लाखो रुपयाचे नुकसान केले आहे. याची संबंधित प्रशासन दखल घेऊन होत असलेला अन्याय दुर करेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

"कुणी कितीही त्रास दिला तरी मी माझा मुलगा शहीद प्रशांत पाटील याची आठवण म्हणून किल्लेमच्छिंद्रगड पर्यटनस्थळ हरित करणारच. याकामी झटणाऱ्यां हाताना मला उदरनिर्वाहासाठी मिळणाऱ्या पेन्शन मधून मदत करीत राहीन.

- वीरमाता राजाक्का जोतीराम पाटील, किल्लेमच्छिंद्रगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.