
सांगली : लूटमारप्रकरणी पोलिसांनी तडजोड केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गांभीर्याने दखल घेतली. याप्रकरणी पोलिस उपाधीक्षकांना अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले. याबाबतचा अहवाल अधीक्षक घुगे यांच्याकडे सादर करण्यात आला असून त्यातील दोषी पोलिसांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. उद्या (ता. ७) पोलिस अधीक्षक कोणता निर्णय घेणार, याकडे जिल्हा पोलिस दलाचे लक्ष राहिले आहे.