गणपती पंचायतनच्या "चोर' गणपतीची प्रतिष्ठापना...संस्थान गणेशोत्सव साधेपणाने सुरू

अजित कुलकर्णी
Wednesday, 19 August 2020

सांगली- कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने यंदा संस्थानच्या गणेशोत्सवाचा उत्साह मावळला आहे. यंदा कोरोनामुळे भक्‍तांविना साजरा होणारा हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय गणपती पंचायतन ट्रस्टने घेतला आहे. चोर पावलांनी येणाऱ्या चोर गणपतीची आज बुधवार (ता. 19) रोजी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

सांगली- कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने यंदा संस्थानच्या गणेशोत्सवाचा उत्साह मावळला आहे. यंदा कोरोनामुळे भक्‍तांविना साजरा होणारा हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय गणपती पंचायतन ट्रस्टने घेतला आहे. चोर पावलांनी येणाऱ्या चोर गणपतीची आज बुधवार (ता. 19) रोजी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणाऱ्या या चोर गणपतीला 200 वर्षांची ही परंपरा आहे. यंदा मंदिर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याने फक्‍त पूजा-अर्चा केली जाणार आहे. गणपती संस्थानच्या गणेशोत्सवाचा दरवर्षी शाही माहोल असतो. पंचायतन संस्थानच्या गणेशाची मात्र प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या तीन दिवस आधी प्रतिष्ठापना होते. चोर गणपती केव्हा आला अन्‌ गेला याचा भक्‍त भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने विघ्नहर्त्याला "चोर गणपती' म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे. गणेशचतुर्थीच्या आधी चार दिवस या चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते. त्यानंतर दरबार हॉलमध्ये संस्थानचा गणेशोत्सव थाटामाटात सुरु होतो. 

पर्यावरणपूरक मूर्ती 
प्रतिपदेला पहाटे पाच वाजता पारंपरिक पद्धतीने "चोर' गणपतीची प्रतिष्ठापना झाली. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून ती तशीच आहे. दरवर्षी रंगरगोटीशिवाय तिला हात लावला जात नाही. मुख्य मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. भाविक-भक्तांना हात लावून दर्शन घेता येते. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Installation of Ganpati Panchayat's "Thief" Ganpati . Sansthan Ganeshotsav begins simply