परिचारिका दिन विशेष : काळजावर दगड ठेवून 'आई' निभावतीये कर्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिचारिका दिन विशेष : काळजावर दगड ठेवून 'आई' निभावतीये कर्तव्य

परिचारिका दिन विशेष : काळजावर दगड ठेवून 'आई' निभावतीये कर्तव्य

देवराष्ट्रे : चिंचणी (ता.कडेगाव) येथील चिंचणी वांगी ग्रामीण रुग्णालयात (primary helath center) काजल सानप या परिचारिका म्हणून (nurse) कार्यरत आहेत. तेथील कोविड रुग्णांवर त्या उपचार करत आहेत. आपल्या दीड वर्षाच्या मुलापासुन दूर राहून ही माऊली कोरोनाच्या (covid-19) लढाईत कर्तव्य बजावत आहे. (international nurses day front lite nurses appeal to people)

कर्तव्य निभवताना आईला (mother) आपल्या दीड वर्षाच्या लेकराची काळजी लागते. तो घरी काय करत असेल? खेळतोय का? रडत असेल का? त्याला भूक लागली असेल का? अशा अनेक विचारांनी माऊलीच्या जीवाची घालमेल होत असते. लेकराची आठवण येते, म्हणून व्हिडिओ कॉलवर (video call) त्याला पाहणे होते. काजल यांचे पती वनविभागात (forest department) नोकरी करतात. त्यामुळे मुलाला संभाळ करण्यासाठी त्यांनी मदतनीस ठेवली आहे. काजल घरी जाताना निर्जंतुकीकरण करुन जातात.

हेही वाचा: International Nurse Day 2021: लढतो आहोत, मरेपर्यंत राबवू नका

घरी आल्यावर मुलगा आई.. आई अशी आर्त हाक देतो. मायेचा पाझर फुटतो, जवळ घेऊ वाटत पण घेता येत नाही. आपल्या दीड वर्षाच्या लेकरासोबत तिला आपल्या घरात राहायचे आहे. पण कोरोनाची दूसरी लाट आहे. देशासह, महाराष्ट्रात (maharashtra) कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मायेपेक्षा कर्त्तव्य मोठे म्हणून काळजावर दगड ठेवून ही माऊली कोरोनाग्रस्तांवर (corona positive) उपचारसाठी असलेल्या वार्डमध्ये परिचारिका म्हणून काम करीत आहे. आपला महाराष्ट्र कोरोनामुक्त झाला पाहिजे. नागरीक सुरक्षित राहिले पाहिजेत. परिचारिका आई 'आर्त साद घालतीये, आम्ही तुमच्या सेवेसाठी सज्ज आहोत, दिवस रात्र मेहनत करत आहोत. काही दिवसांचा प्रश्न आहे. घराबाहेर पडू नका. प्रशासनास सहकार्य करा आणि कोरोनाचा संसर्ग रोखा असे आवाहन परिचारिका काजल सानप यांनी केले.

Web Title: International Nurses Day Front Lite Nurses Appeal To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SangliNurse Day
go to top