महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी ‘उमेद’ अभियानातून प्रयत्न सुरू आहेत.
सांगली : स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना (Rural Women) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने महिला बचत गटांना विविध उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. याच बचत गटांच्या उत्पादनांनी ‘ई-कॉमर्स’च्या प्लॅटफॉर्मवरही (E-commerce Platform) पाऊल टाकले आहे. जिल्ह्यातील बचत गटांची २० उत्पादने ‘उमेद मार्ट’ या पोर्टलवर उपलब्ध झालीत.