ऑनलाईन बुद्धिबळमध्ये इराणचा नवाझ अली विजेता

घनशाम नवाथे 
Friday, 25 September 2020

पुरोहित चेस ऍकॅडमीच्या सहकार्याने आणि विश्वगंगा चेस ऍकॅडमी सातारा आणि चेसनट ऍकॅडमी सोलापूर यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत इराणचा नवाझ अली विजेता ठरला. 

सांगली : बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस पुरोहित यांच्या पुरोहित चेस ऍकॅडमीच्या सहकार्याने आणि विश्वगंगा चेस ऍकॅडमी सातारा आणि चेसनट ऍकॅडमी सोलापूर यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत इराणचा नवाझ अली विजेता ठरला. 

खुला गट ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये नवाझ अलीने 81 गुणांसह विजेतेपद पटकावले. पश्‍चिम बंगालचा अनुस्तुप बिस्वास हा 66 गुणांसह उपविजेता ठरला. तमिळनाडूचा मानांकित खेळाडू जी. गौतम यास 65 गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. तमिळनाडूचाच मानांकित खेळाडू अरुल आनंद यास 61 गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. कर्नाटकच्या प्रथमेश देशमुख यास 60 गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले. 

तसेच 2000 पेक्षा कमी मानांकन असलेल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आंध्र प्रदेशचा संकर रेड्डी हा विजेता ठरला. त्याने 58 गुणांसह विजेतेपद पटकावले. तेलंगणाचा चिद्विलास साई हा 53 गुणांसह उपविजेता ठरला. केरळचा मानांकित खेळाडू अबदाल्लाह निस्थर यास 51 गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. महाराष्ट्राच्या आर्य राठोड यास 46 गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. आसामच्या मरिनमोय राखोवा यास 43 गुणांसह पाचवे स्थान मिळाले. सांगली जिल्ह्यातील खेळाडू अर्णव पाटील, केशव सारडा, सर्वेश गवळी, रुद्र जाधव, त्रिशा राहाटे यांना विविध वयोगटांत उत्कृष्ट खेळाडू म्हणून विशेष पारितोषिके दिली गेली. 

पंच शार्दूल तपासे, प्रशिक्षक चंद्रशेखर कोरवी यांनी संयोजन केले. तांत्रिक पंच श्री. तपासे, दीपक वायचळ, सारंग पुरोहित यांनी काम पाहिले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iran's Nawaz Ali wins online chess compitation