Ishwarpur Politics : एकनाथ शिंदेंच्या 'त्या' निर्णयाला थेट हायकोर्टात आव्हान! ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा वाद पुन्हा पेटला; शिंदे गटाच्याच पदाधिकाऱ्याची याचिका

Ishwarpur mayor Anandrao Malgunde disqualification case : ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला जयकर जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.
Eknath Shinde decision on Ishwarpur mayor disqualification

Eknath Shinde decision on Ishwarpur mayor disqualification

esakal

Updated on: 

ईश्वरपूर : ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेचा वाद पुन्हा न्यायालयात पोहोचला (Jaykar Jadhav Bombay High Court petition) आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १० जुलै २०२६ रोजी दिलेला अपात्रतेचा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ नोव्हेंबरला रद्द केला होता. या निर्णयाला शिवसेना शिंदे गटाचे वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख जयकर जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

Loading content, please wait...