CM Devendra Fadnavis
esakal
ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरवासीयांची ईश्वरपूर नामांतराची १७२ वर्षांची मागणी आम्ही पूर्ण करून शहरातील नागरिकांच्या भावनांचा आदर केला आहे. आता उरुण-ईश्वरपूरही केले आहे. शहरासाठी भुयारी गटर योजना, २४ बाय ७ पाणी योजनेच्या कामाला मंजुरी दिली आहे. निवडणुकीनंतर ही कामे करून शहर राज्यात आदर्श करण्यासाठी प्रयत्न करू, तुम्ही जे मागितले ते दिले. आता आमची मागायची वेळ आहे, त्यामुळे महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे व नगरसेवकपदाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.