Atrocity Threat Case
esakal
इस्लामपूर : अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आंदोलन करणाऱ्या समितीने मंडप व्यावसायिकाचे १ लाख ३० हजार रुपयांचे बिल थकवले असून, भाडे मागितल्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी (Atrocity Threat Case) दिल्याचा गंभीर आरोप मंडप व्यावसायिक प्रदीप पाटील यांनी केला. त्यांनी याबाबतची लेखी तक्रार इस्लामपूर ठाण्यात दिली.