इस्लामपूर : बोरगाव पुल पाण्याखाली; कृष्णेची पाणी पातळी स्थिर

पाऊस थांबला असला तरी बाधित घरातील नागरिकांनी घरी जाण्याची घाई करु नये.
इस्लामपूर : बोरगाव पुल पाण्याखाली; कृष्णेची पाणी पातळी स्थिर

इस्लामपूर : वाळवा तालुका परिसरात आणि धरणक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने वारणा आणि कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आज स्थिर राहिली. वारणा नदीत होणारा विसर्ग कमी केल्याने दुपारनंतर नदीची पाणी पातळी ओसरण्यास सुरुवात झाली. मात्र कृष्णेची पाणी पातळी स्थिर आहे. पाऊस थांबला असला तरी बाधित घरातील नागरिकांनी घरी जाण्याची घाई करु नये. आज दिवसभरातील परिस्थितीचा अंदाज घ्यावा, असे आवाहन तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी केले.

आज दुपारपर्यंत बोरगाव पुल पूर्ण पाण्याखाली गेला आहे. बहे पुलाची पाण्याची पातळी ३२.६ इतकी आहे. बोरगाव व बहेचा पूल अद्याप वाहतुकीसाठी बंद आहे. तांदूळवाडी, कणेगाव, भरतवाडी या भागात मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाणी आले आहे. भरतवाडी गेल्या तीन दिवसांपासून पाण्यात आहे. तांदूळवाडी ते कणेगाव दरम्यान महामार्गावर दोन ते चार फुट पाणी आहे. त्यामुळे आशियायी महामार्ग बंद आहे. उड्डाणपुलाखाली पाणी आल्याने बहादूरवाडी व कोरेगावकडे जाणारी वाहतूक थांबली. याशिवाय भरतवाडीतील नागरिकांना महामार्ग बंद असल्याने बाहेर येणे अडचणीचे झाले आहे.

इस्लामपूर : बोरगाव पुल पाण्याखाली; कृष्णेची पाणी पातळी स्थिर
कृष्णेचा महापुर ओसरायला सुरवात; 4 फुट पाणी उतरले

परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दूध व्यवसायही ठप्प आहे. येलूर बाजारपेठेतील पाझर तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्याने एक हजार फुट अंतराचा मुख्य मार्ग अक्षरशः खरडून निघाला आहे. वारणा काठावरच्या शिगाव गावातील ८० टक्के लोकांचे स्थलांतर झाले आहे. सुमारे ५०० कुटुंबांसह ५०० जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ग्रामपंचायत व हवामान खात्याच्या कार्यालयाला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.

स्थलांतरीत जनावरांसाठीही चाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. रेठरे हरणाक्ष येथील गावच्या शेतशिवारात काल दुपारी पाण्याने केलेल्या प्रवेशाची स्थिती अद्यापही जैसे थे आहे. गावातील जोतिबा मंदीरात सुमारे चार फूट पाणी आहे. प्रशासकीय सुचना येईपर्यत बहे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. शिरटे, नरसिंहपूर, येडेमच्छिद्र, बिचूद मधील शेतशिवारातील जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने गोठ्यांची दुरावस्था झाली आहे. परीसरातील सोयाबीन, भुईमूग तसेच नव्याने केलेल्या आडसाली ऊसाची शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना अर्थिक हानीस सामोरे जावे लागणार आहे. वाळवा, शिरगांव येथील पुराच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. बहे पुलाची पाण्याची पातळी ३२.६ इतकी आहे. बोरगाव व बहेचा पूल अद्याप वाहतुकीसाठी बंद आहे.

इस्लामपूर : बोरगाव पुल पाण्याखाली; कृष्णेची पाणी पातळी स्थिर
दरड कोसळली; आंबा घाट वाहतूकीसाठी बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com