Islampur Politics : विरोधकांचं ठरेना! जयंत पाटीलविरोधक एकत्रित आले, तरच सामना होणार चुरशीचा

Islampur Constituency Politics : जयंत पाटील (Jayant Patil) नेहमीप्रमाणे विरोधकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
Islampur Constituency Politics
Islampur Constituency Politicsesakal
Updated on: 
Summary

विरोधकांतील वजीर हेरून त्यालाच प्रसंगी मैदानात उतरवून समोरच्या तयारीत असलेल्या राजाला चेकमेट करतात.

इस्लामपूर : विधानसभेचे नगारे वाजत असताना इस्लामपूर मतदारसंघात (Islampur Constituency) मात्र जयंत पाटील यांच्यासमोरचा पैलवान कोण, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाला की भाजपला, हा तिढा पहिल्यांदा सोडवावा लागेल. मात्र वरिष्ठ पातळीवरून उमेदवारावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. तेव्हा जयंत पाटील यांच्या विरोधात गतवेळचे भाजपचे उमेदवार निशिकांत पाटील, शिंदे शिवसेनेचे आनंदराव पवार की गौरव नायकवडी, यावर शिक्कामोर्तब होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com