Jayant Patil
esakal
इस्लामपूर : नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील. याबाबतची घोषणा आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली. यावेळी त्यांनी जगातला सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला (BJP) आघाडी न करता इस्लामपुरात स्वतंत्रपणे लढण्याचे खुले आव्हान दिले.