
इस्लामपूर : एकमेकांकडे खुन्नस देऊन बघितल्याच्या कारणावरून रोहित ऊर्फ बारक्या पंडित पवार (वय २३, बेघर वसाहत, इस्लामपूर) या गुंडाचा खून केल्याप्रकरणी हौसेराव कुमार आंबी (वय २१, हुबालवाडी) याला पाच तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. घटनेतील अन्य दोघांना निरीक्षणगृहात पाठवण्यात आले. शुक्रवारी (ता. १) दुपारी इस्लामपूर-ताकारी रस्त्यावरील आरआयटी कॉलेजसमोर दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी ओंकार राजेंद्र गुरव (२३, वाकोबा मंदिराजवळ, इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.