OBC Community
esakal
इस्लामपूर : ओबीसी समाजाने आज घेतलेल्या संयुक्त बैठकीत मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून जागा देण्याच्या हालचालींना तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘ओबीसीने (OBC Community) संघर्ष करून मिळवलेले आरक्षण कोणालाही वाटून घेता येणार नाही. सरकारने मराठ्यांना (Maratha Reservation) ओबीसी आरक्षणात सामावून घेतले तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल,’ असा इशारा इस्लामपुरातील ओबीसीच्या बैठकीत देण्यात आला.