करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाचा किरणोत्सव केव्हा?

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाचा किरणोत्सव केव्हा?
Updated on

कोल्हापूर - तीर्थक्षेत्र विकासासाठी २५५ कोटींचा आराखडा तीन टप्प्यांत तयार केला असून, पहिल्या टप्प्यासाठी निधीची घोषणा झाली; मात्र पुढील प्रक्रिया रखडली. जुलैमध्ये विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंदिरातील पहिल्या टप्प्यातील कामांचे अंदाजपत्रक तत्काळ सादर करावे, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू झाली.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेने एकूण ८७ कोटींच्या कामाचा आराखडा सरकारला सादर केला. त्यानुसार १५ ऑक्‍टोबरला कामाबाबतच्या ‘जीआर’चा मसुदाही महापालिकेला प्राप्त झाला आहे. मात्र, त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. 

पहिल्या टप्प्यातील कामे...
दर्शन मंडप, भक्त निवास, स्वच्छतागृह बांधणी, सरस्वती चित्रपटगृह येथे बहुमजली इमारत, बिंदू चौकात बहुमजली पार्किंग व्यवस्था, बसथांबे, पादचारी मार्ग, दिशादर्शक फलक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत वाहिनींचे स्थलांतर, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, दर्शन मंडप, नव्या इमारतींत सौरऊर्जा, बहुमजली पार्किंग इमारतींत स्मार्ट पार्किंगची व्यवस्था.

पगारी पुजारी कायदा...
अंबाबाई मंदिराची अंमलबजावणी होऊन मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय झाला. मंदिर कायद्यानुसार व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवडीचीही केवळ चर्चाच आहे. प्रत्यक्षात कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, देवस्थान समितीच्या पातळीवर ही प्रक्रिया अद्यापही सुरू असून, किमान काही कालावधी त्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येते.

मंदिर परिसर जतन व संवर्धन
मंदिर परिसर जतन व संवर्धनासाठीही प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यासाठी देवस्थान समितीने भाविकांच्या सूचना व हरकती मागवल्या आहेत. अनेक ठिकाणांहून भाविकांच्या सूचना व हरकती येत असून, त्याचा विचार करून मंदिर परिसराच्या जतन व संवर्धनासाठीचा निर्णय घेतला जाणार आहे. 

पर्यटन विकासासाठी...
गेल्या काही वर्षात अंबाबाईला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. पूर्वी नवरात्रोत्सवानंतर थेट उन्हाळी सुटीतच मोठी गर्दी व्हायची. पण, आता नवरात्रोत्सवानंतर लगेचच दिवाळी सुट्टी आणि त्यानंतर सलग तीन सुट्या आल्या की मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आता प्रत्येक आठवड्यातील किमान दोन ते तीन दिवस सरासरी पंचवीस हजार भाविक मंदिरात भेट देतात. त्यामुळे परिसरातील विविध विक्रेत्यांच्या अर्थकारणाला चालना मिळाली आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत कामासाठी किमान पंचवीस कोटींचा निधी वर्ग व्हावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत याबाबत ठोस निर्णयाची अपेक्षा आहे. अंबाबाई मंदिर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मात्र आणखी काही काळ द्यावा लागेल.
- महेश जाधव,
अध्यक्ष, देवस्थान समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com