असं जगणं अमेरिकन्सना अशक्‍यच ! 

e
e
Updated on

अमेरिकेत जवळपास दोन महिने संचारबंदी-टाळेबंदी सुरु आहे. असं जगणं स्वातंत्र्याचे भोक्ते असलेल्या अमेरिकन्सना असह्यच. त्यामुळे दोन आठवड्यापुर्वी स्टेट कॅपिटलमध्ये संचारबंदीविरोधात निदर्शने झाली. त्यामुळे आता फार काळ टाळेबंदी चालेल असं वाटत नाही. साथीचा आलेखही खाली येतोय...आता जनजीवन पुर्ववत कधी होतेय याची प्रतिक्षा. 
 
सुमारे कोटी लोकसंख्येच्या मिशिगन राज्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या पन्नास हजार पार झाली आहे. चार हजार 825 इतके मृत्यू झाले आहेत. आता रोजच्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे. सरासरी रोज तीनशे ते चारशे रुग्ण आढळून येत आहेत. आमच्या शहरात चाळीसहून अधिक मृत्यू झाले आहेत. मात्र बहुतेक मृत्यू ज्येष्ठांचे आहेत. त्यांना कोणता ना कोणता विकार होता असेच आहेत. मात्र तरीही इथं भितीचं वातावरण आहे. मात्र ते मुळच्या अमेरिकन्समध्ये नाही. दोन आठवड्यापुर्वी स्टेट कॅपिटलमध्ये संचारबंदीविरोधात धरणे आंदोलन झाले. या आंदोलनात भारतीय नव्हते. मात्र असं बांधून ठेवणं अमेरिकन्सना आजिबात मान्य नाही. बीचवर जाता येत नाही याचा त्यांना खूप त्रास होतोय. आता उन्हाळा सुरु होणार आहे. त्यांना तो एन्जॉय करायचा आहे. त्यामुळे टाळेबंदी-संचारबंदी उठवावी यासाठी लोकांचा सरकारचा दबाव वाढणार आहे. लोकांना आता जॉब नसल्याचाही मोठा त्रास होतोय. सरकारने रोजंदारीवरील कामगारांसाठी आठवड्याला अडीचशे डॉलरची मदत दिली आहे. करदात्या नोकरदारांनाही दरमहा दोन ते तीन हजार डॉलर इतकी मदत दिलीय. त्यामुळे लोकांचे जगण्याचे वांदे नाहीत. मात्र लोक फार काळ अशा स्थितीत राहणार नाहीत. 
मी इथल्या फियाट कंपनीत तर माझी पत्नी डॉमिनोज कंपनीसाठी काम करते. आम्हा दोघांचंही सध्या वर्क फ्रॉम होम सुरु आहे. मुलांना सुट्टी आहे. मात्र त्यांच्या ऑनलाईन शाळेला आम्हाला सामोरे जावे लागतेय. नित्य कामासोबत हे काम म्हणजे मोठा तणावपूर्ण जॉब आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्वच मुलं परिक्षेविना पास झाली आहेत. आता पुढील वर्षासाठी सप्टेंबरपासून शाळा सुरु होतील. तोपर्यंत मुलांची शाळा घरातूनच. एकूणच सध्या सारे तणावाचे आणि कंटाळा आणणारे आहे. त्यामुळे परवा आम्ही संधी मिळताच एका मित्राचा फिजिकल डिस्टन्स ठेवून त्याच्या घराच्या आवारात वाढदिवस साजरा केला. 
अमेरिकेत कोरोना इतकीच सध्या निवडणुकांची चर्चा आहे. पंधरा मेपासून इथे उन्हाळा सुरु होतो. निवडणुकीचे वातावरण तापत जाईल. कोरोनाचे सावट असले तरी येत्या नोव्हेंबर-डिसेंबर निवडणुका वेळेवरच होतील याबद्दल मात्र कोणाला शंका नाही. भारताचे अमेरिकेसोबतच संबंध दृढ होत असले तरी भारतीयांबाबतच्या ग्रीन कार्डबाबतचे अमेरिकेचे धोरण काही बदलताना दिसत नाही. कोरोना रुग्णसंख्या घटत आहे. सारे काही पुर्वपदावर येईल अशी आशा आहे. 
......... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com