esakal | ज्ञानेश सावंत यांना जगन फडणीस पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानेश सावंत यांना  जगन फडणीस पुरस्कार

कोल्हापूर - ज्येष्ठ पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे दिला जाणारा शोध पत्रकारिता पुरस्कार पुणे ‘सकाळ’चे बातमीदार ज्ञानेश सावंत यांना जाहीर झाला आहे. येत्या बुधवारी (ता. २८) शाहू स्मारक भवनात खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

ज्ञानेश सावंत यांना जगन फडणीस पुरस्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - ज्येष्ठ पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे दिला जाणारा शोध पत्रकारिता पुरस्कार पुणे ‘सकाळ’चे बातमीदार ज्ञानेश सावंत यांना जाहीर झाला आहे. येत्या बुधवारी (ता. २८) शाहू स्मारक भवनात खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

याबाबतची माहिती जगन फडणीस स्मृती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्येष्ठ पत्रकार जगन फडणीस यांच्या स्मृतिनिमित्त गेली बारा वर्षे शोधपत्रकरिता करणाऱ्यांना ट्रस्टतर्फे पुरस्कार दिला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठी सावंत यांची निवड झाली आहे. तलावात नसलेली जलपर्णी काढण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे २३ कोटी रुपयांची निविदा काढली होती. या प्रकरणाचा पर्दाफाश सावंत यांनी बातमीद्वारे केला. त्यामुळे महापालिकेने निविदा रद्द केली. या प्रकरणाची चौकशी आता राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.

loading image
go to top