सांगली : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीरांचा (Lord Mahavir) २६२४ वा जन्मकल्याण महोत्सव आज (ता. १०) होतोय. जिल्ह्यात जैन संस्कृतीच्या (Jain Culture) प्राचीन पाऊलखुणा विविध गावांत विखुरल्या आहेत. शेकडो वर्षांपासून येथे जैनधर्मीय नांदत आहेत. एक हजार वर्षांपूर्वीचे शिलालेख, ताम्रपट यांच्यामधून जिल्ह्यातील समृद्ध जैन संस्कृतीचा मागोवा घेता येतो. त्या काळात जिल्ह्यात भव्य जैन मंदिरे उभारली गेली.