
सांगली: जम्मू-काश्मीरच्या भूमीत सांगलीकर तरुणांनी इतिहास रचला. एक-दोन नव्हे, तर तब्बल एक हजार तरुणांनी जम्मूत एका वेळी रक्तदान केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरमध्ये जाऊन रक्तदान केले. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘सिंदूर महारक्तदान’ उपक्रम चर्चेचा विषय ठरला. काश्मिरी जनतेसह सैनिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.