जपानी मेंदुज्वराचे राज्यात १२ बळी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 July 2019

राज्यात यंदा प्रथमच चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वराने शिरकाव केला असून, त्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर - राज्यात यंदा प्रथमच चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वराने शिरकाव केला असून, त्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

दुसरीकडे स्वाइन फ्लूमुळे १९६ आणि डेंगीमुळे तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आता प्राण्यांचे आजार नागरिकांना होत असल्याने राज्यस्तरावरील समितीअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात शीघ्र प्रतिसाद पथकांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. 

ग्रामपंचायतींमधील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधील नमुने दर तीन महिन्यांनी पडताळले जात आहेत. आरोग्य विभागाकडून ठोस उपाययोजना केल्याचा दावा केला असतानाही राज्यातील साथीच्या रोगांचे थैमान थांबण्याचे नाव घेत नाही. नाशिक, नागपूर, नगर व पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक स्वाइन फ्लूचे, तर कोल्हापूर, पुणे, ठाणे जिल्ह्यांत डेंगी आणि कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत चिकन गुनियाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japanese Meninges 12 victims in state