

Gopichand Padalkar
esakal
जत: ‘‘जत तालुक्याची ओळख यापुढे दुष्काळी तालुका म्हणून नव्हे, तर ‘देवभूमी जत’ अशी व्हावी, यासाठी नामांतराचा अंतिम प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात आला आहे. तो लवकरच मंजूर होईल, ’’ असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. येथे विभागीय कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते.