जत : जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल हाती येत असतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल, फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. .पहिल्या फेरीपासून भाजपचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांच्यासह प्रभाग एक, दोन व तीनच्या मतमोजणीत आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले होते. दरम्यान, भाजपचा हा उत्साह शेवटच्या तिसऱ्या फेरीपर्यंत पाहायला मिळाला. .Sangli Election Result : पलूसमध्ये काँग्रेसचा झंझावात; २० पैकी १५ जागांवर दणदणीत विजय.काँग्रेसच्या प्रभाग चार, आठ, नऊ, दहा व अकरा मधील कार्यकर्ते सोडले, तर काँग्रेसच्या गोटात नाराजीचा सुरू होता. मतमोजणीपूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी दावे- प्रतिदावे केलेले होते. मात्र, निकालाचे आकडेवारी स्पष्ट होताच, अनेकांना धक्का बसलाच, तर विजयी उमेदवारांना ही निकालातून धक्का बसला..दरम्यान, शेवटच्या फेरीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांना खांद्यावर घेत जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांच्यासह अनेक महापुरुषांना अभिवादन करण्यात आले..Sangli Eletion : ‘धुरंधर’ ठरले भारी; नगरपालिका निकालानंतर आठ शहरांत गुलालाचा महाजल्लोष.यावेळी पंधरा ते वीस जेसीबी, डम्पर मधून गुलालाची उधळण करत जत शहरातील प्रमुख रस्ते भाजपाच्या उत्साहाने गुलालमय झालेले दिसून होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.