जत : तालुक्याच्या राजकारणाची समीकरणं आटपाडीतून आलेल्या गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) बदलून टाकली आहेत. सगळे डाव मोडीत काढत पडळकरांमुळे आगामी जत नगरपरिषदेची निवडणूक (Jat Municipal Council Election) अधिक रंगतदार होणार आहे. त्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण, ही लढत आता पारंपरिक राहिलेली नाही. पडळकर विरुद्ध माजी आमदार विक्रम सावंत या लढ्यात माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, पर्यायाने सत्तेसमवेत गेले आहेत. त्याचा किती परिणाम होतो, याकडे लक्ष असेल.