Jat Sangli Crime News
esakal
जत (सांगली) : जत शहरातील उमदी येथील एका तरुणांस नग्नावस्थेत तोंड, डोक्यात धारदार शस्त्राने वार करून ठेचून निर्घृणपणे खून (Sangli Crime News) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विकास मलकारी टकले (वय २५, रा. घुले वस्ती, उमदी, ता. जत) असे मृत व्यक्तीचे नाव असून, काल दुपारी १२ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत जत पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.