जत तालुक्‍यात कॉंग्रेसला 11, भाजपला प्रत्येकी नऊ जागा

बादल सर्जे 
Monday, 18 January 2021

जत  : तालुक्‍यात शेगाव, उटगी, अंकले या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर घडवत भाजपने नऊ ठिकाणी आपले वर्चस्व निर्माण केले असून 11 ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसने आपला झेंडा फडकविला आहे.

जत  : तालुक्‍यात शेगाव, उटगी, अंकले या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर घडवत भाजपने नऊ ठिकाणी आपले वर्चस्व निर्माण केले असून 11 ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसने आपला झेंडा फडकविला आहे. मात्र, महत्वाच्या ग्रामपंचायती हातून गेल्या. नऊ ठिकाणी स्थानिक विकास आघाड्यांना यश मिळवता आले आहे. टोणेवाडी ग्रामपंचायत यापूर्वी बिनविरोध निघाली आहे. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारात त्याठिकाणी परिवर्तन घडवून आणले. 

निकालानंतर प्रत्येक गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला व गुलालाची उधळण करत फटाक्‍यांची आतषबाजी केली. पोस्टल मतपत्रिका उशिरा प्राप्त झाल्याने सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. अवघ्या दोन तासात सर्व निकाल स्पष्ट झाले. प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसिलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पूर्ण झाली. दि. 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. 246 जागांसाठी 540 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यापूर्वी टोणेवाडी ग्रामपंचायत सह 32 उमेदवार बिनविरोध निघाले आहेत. 

पहिल्या फेरीत उमराणी व वळसंग ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला. उमराणीमध्ये भाजपच्या गटाला 11 जागा तर विद्यमान कॉंग्रेसचे सत्ताधारी गटाला 4 जागा, शेगावमध्ये भाजपच्या गटाला 12 तर कॉंग्रेसला एक, उटगीमध्ये भाजपच्या गटा संपूर्ण 13 जागा, सिंगनहळ्ळी मध्ये कॉंग्रेसला संपूर्ण 9 जागा, मेंढेगिरीमध्ये कॉंग्रेसला 9 जागा, येळदरीमध्ये कॉंग्रेस 6, भाजप 3, गुगवाडमध्ये कॉंग्रेस 8, भाजप 3, अंकलेमध्ये भाजपला 8 तर कॉंग्रेसला 3, कुलाळवाडीमध्ये भाजपला 7 तर कॉंग्रेसला 2, निगडी बुद्रुक मध्ये भाजपला 3 तर कॉंग्रेसला 6, मोरबगी भाजप 2 तर कॉंग्रेसला 7, तिकोंडी भाजपला 6 तर कॉंग्रेसला 5, जालिहाळ खुर्द भाजपला 6 तर एक बिनविरोध.

 सिध्दनाथ कॉंग्रेसला संपूर्ण 9, गुड्डापूर भाजपला 5 तर कॉंग्रेसला 4, घोलेश्वर कॉंग्रेसला 4 तर अपक्ष 3, भिवर्गीत जनसुराज्य व कॉंग्रेस पक्षाला 11, लमानतांडा (उटगी) भाजपला संपूर्ण 7, धावडवाडी संपूर्ण कॉंग्रेसला 7, सनमडी भाजपला 5 तर कॉंग्रेसला 4, शेड्याळ भाजप 4, शिवसेना 1 व कॉंग्रेस 4, डोर्ली भाजपला 6 तर कॉंग्रेसला 3 उंटवाडी कॉंग्रेस 6 तर अपक्ष एक, अंकलगी कॉंग्रेस व भाजप मिळून 9, कुडणूर मध्ये स्थानिक आघाडी 9, लमानतांडा (दरिबडची) स्थानिक आघाडी 7, सोनलगी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्थानिक आघाडी 9 जागा मिळाल्या.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Jat taluka, Congress got 11 seats and BJP got nine seats each