जत: ‘‘जत कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा, म्हणणारे निवडणुकीत विसरले, असा प्रचार काही जण करत आहेत. त्यांना माझं एकच सांगणं आहे, लवकरच शेतकऱ्यांना समवेत घेऊन मोर्चा काढणार आहे..याशिवाय, भाजपला व मला रोखण्यासाठी ज्यांनी षड्यंत्र रचलं, त्यांची तुतारीच निवडणुकीतून गायब होण्याची दुर्दैवी वेळ आली आहे,’’ अशी बोचरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता आज येथे केली..Sangli News: आष्टा निवडणुकीत अर्जांचा विक्रमी पाऊस! नगराध्यक्षपदासाठी ११ तर नगरसेवकपदासाठी तब्बल २०६ अर्ज दाखल.‘‘या निवडणुकीत राजकारण, गटतट न आणता विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवा. माझ्याकडे शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. एकदा संधी द्या, जत शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवू,’’ असे अभिवचन आमदार पडळकर यांनी दिले..जत नगरपरिषदेसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्तिप्रदर्शन करत दाखल केला. त्यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधतानाच जतच्या स्थानिक नेत्यांवर टीका-टिपण्णी करणार नाही, उलट जनतेसमोर विकासाचे नवे मॉडेल आणि ब्ल्यू प्रिंट घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले..Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली.येथील बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजपच्या रॅलीला सुरुवात झाली. जत बसस्थानक, बाजारपेठ, गांधी चौक, नगरपालिका, संभाजी चौक ते शिवाजी पेठ येथे आली. येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले..यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रशेखर गोब्बी, अशोक बन्नेनवर, सरदार पाटील, सुनील पवार, सुभाष गोब्बी, आप्पासो नामद, अण्णा भिसे, परशूराम मोरे, विक्रम ताड, रवी मानवर, पापा कुंभार, राजू यादव, सुभाष कांबळे, अनिल पाटील, लक्ष्मण जखगोंड, डॉ. प्रवीण वाघमोडे, डॉ. वीणा तंगडी, बसवराज चव्हाण, चंद्रकांत गुड्डोडगी, स्वप्ना स्वामी, शारदा कुंभार, यांच्यासह पदाधिकारी उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते..आमदार गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, ‘‘विधानसभेला तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला. त्याप्रमाणे जत शहराची पालिकाही आमच्या ताब्यात द्या. मागच्या पन्नास वर्षांत जितका निधी जतला आला नाही, तितका निधी फक्त एक वर्षात आणतो.’.ते म्हणाले, ‘‘नगराध्यक्ष पदासाठी डॉ. आरळींसारखा उच्च विद्याविभूषित उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी जनतेला हवे असणारे चेहरे दिले आहेत. एकदा संधी द्या. आज तालुक्यात काम करतो आहोत, त्याहून अधिक निधी शहराला देऊ. शिवाय जतकरांच्या घराघरांत जाऊन विकासाची संकल्पना मांडणार आहोत.’’ डॉ. आरळी म्हणाले, ‘‘दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. जत तालुक्यात विकासाचे नव पर्व सुरू झाले आहे.’’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.