Jath Tractor Accident
esakal
जत : मुचंडी (ता. जत) ते कोट्टलगी रस्त्यावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात (Jath Tractor Accident) दोघे जागीच ठार; तर एक गंभीर जखमी झाला आहे. अभिषेक विनोद आरेकर (वय २२), सलमान सिकंदर मुक्केरी (१९, दोघे रा. चिकट्टी, ता. अथणी, रा. कर्नाटक) अशी मृतांची नावे असून, गुरुवारी (ता. ९) पहाटे ही घटना घडली आहे.