Jayant Patil : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावची मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढत असताना, आमदार जयंत पाटील यांनी विकासकामांचा थेट हिशेब मांडत विरोधकांवर निशाणा साधला.
ईश्वरपूर : बावची जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध गावांत १०१ कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावल्याचा दावा आमदार जयंत पाटील यांनी केला. बावची, गोटखिंडी व येडेनिपाणी येथे त्यांनी जाहीर सभा घेतल्या.