Political News I भाजप खासदाराचा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांशी 'दोस्ताना'?, राजकारणावर कऱ्हाडात खलबत्तं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp and bjp latest political news

सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील बदलांची कऱ्हाडला खलबते झाल्याचीही चर्चा

भाजप खासदाराचा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांशी 'दोस्ताना'?

कऱ्हाड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या घारेवाडी येथील कार्यक्रमानिमित्ताने येथे आलेल्या जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपचे खासदार संजय पाटील यांनी भेट घेतली. विमानतळावरून वाहनातून दोघेही तत्काळ रवानाही झाले. त्यामुळे भाजपच्या खासदारांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांशी ‘दोस्ताना’ येथे चांगलाच चर्चेत आला. (ncp and bjp latest political news)

सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील बदलांची कऱ्हाडला खलबते झाल्याचीही चर्चा होती. महत्त्‍वाच्या चर्चेसाठीच थेट भेट घेण्यासाठी खासदार पाटील यांनी मंत्री पाटील यांची गोपनीय भेट घेतल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे. घारेवाडी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर आज झाले. त्या शिबिराला भेट देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील येथे आले होते.

हेही वाचा: पॉवरफुल अदानी बारामतीत, आमदार रोहित पवारांनी केले 'सारथ्य'

विमानाने कऱ्हाडच्या विमानतळावर ते उतरले. तेथे राष्ट्रवादीचे युवा नेते व माजी नगरसवेक सौरभ पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, ‘सह्याद्री’चे संचालक पांडुरंग चव्हाण, लालासाहेब पाटील, माजी नगरसेवक गंगाधर जाधव आदींनी त्यांचे स्वागत केले. मंत्री जयंत पाटील येणार असल्याने त्यांच्‍या भेटीसाठी खासदार पाटीलही तेथे आले होते. मंत्री पाटील व खासदार पाटील यांच्यात दोस्ताना सुरू असल्याची सांगलीच्या राजकारणात सध्या चर्चा आहे. त्याला पुष्टी देणारी ही आजची भेट ठरणार होती.

मंत्री पाटील विमानाने येताच तत्काळ खासदार पाटील हे त्यांच्या वाहनात बसून विमानतळातून बाहेर पडले. सांगलीहून फोनव्दारे त्या घटनेची अनेकांनी माहिती घेतली. सोशल माध्यमावरही त्याची चर्चा होती. मंत्री पाटील व खासदार पाटील यांचे वाहन कार्यक्रमाकडे रवाना झाले. मात्र, प्रत्यक्षात घारेवाडीत खासदार पाटील उतरून मागून येणाऱ्या त्यांच्या वाहनात बसून सांगलीकडे रवाना झाले. त्यामुळे कार्यक्रमास्थळी मंत्री पाटील एकटेच पोचले.

हेही वाचा: 'आमचं ठरलंय म्हणणाऱ्यांना आता भाजपची ताकद दाखवून देऊ'

Web Title: Jayant Patil And Bjp Mp Sanjay Patil Meet In Karad Chandges In Sagnli Distrcit Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top