MLA Jayant Patil
कासेगाव/ नेर्ले: ‘‘जतमध्ये काँग्रेस पक्षाशी आघाडी करून निवडणूक लढलो असतो, तर निकाल वेगळा पाहायला मिळाला असता. आपल्या पक्षाला नगरपालिका निवडणुकीत जे यश मिळाले, ते माझ्या एकट्याचे नसून आपण कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचे यश आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही ताकदीने लढून पक्षाची ताकद दाखवून देऊ,’’ असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.