Sangli News : ‘३०० वर्षांपूर्वी दळणवळणाची साधने तोकडी असताना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील १२ जोतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला. घाट व मंदिरे बांधली. केवळ आपल्या राज्यात नव्हे, तर अन्य राज्यांत जाऊनही कामे केली आहेत.
इस्लामपूर : ‘‘राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी कोणत्याही बाह्यशक्तींना कधी जुमानले नाही. त्यांनी मोठ्या हिमतीने रयतेच्या हिताचा कारभार केला आहे,’’ अशी भावना माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.