देशपांडे, इनामदारांवर माझं विशेष प्रेम : जयंत पाटील

jayant patil said in municipal corporation sangali makarand deshpande and shekhar inamdar both special for me
jayant patil said in municipal corporation sangali makarand deshpande and shekhar inamdar both special for me

सांगली : सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत बैठक घेण्याचे आज निमंत्रण दिले. मंत्री पाटील यांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे मान्य केले. मात्र भाजप नेते शेखर इनामदार आणि मकरंद देशपांडे यांच्यावर माझे विशेष प्रेम आहे. ते आलेच पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले.

मिरजेत महापालिकेच्या आरोग्य केंद्राचे आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी महापौर गीता सुतार यांनी आपल्या भाषणात पालकमंत्री जयंत पाटील यांना शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत येण्याचे निमंत्रण दिले. महापौर सुतार म्हणाल्या, मी पक्ष बघत बसत नाही. साहेब, तुम्ही फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवा. मी लोकांसाठी खूप काम करेन. 
महापौरांच्या आवाहनाला पालकमंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. 

ते म्हणाले, सांगलीतील दोन भाजपचे नेते मकरंद देशपांडे आणि शेखर इनामदार यांच्यावर माझं विशेष प्रेम आहे. कदाचित त्या दोघांचा आदेशावरून महापौर तसे बोलल्या असाव्यात असे मी समजतो. मी उद्या येऊन महापालिकेत बसतो सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊ. पण, तुम्हाला आवडते का नाही, माहित नाही म्हणून मी महापालिकेत येत नाही. प्रश्न सोडवण्यासाठी येण्याचे तुम्हीच निमंत्रण दिले आहे. यात पक्षीय भावना नाही. जनतेचे प्रश्न गतीने सुटणे महत्वाचे आहे. कोण मंत्री होते आणि कोणाचं राज्य आहे. हे महत्त्वाचं नसते.

पक्षीय विषय बाजूला ठेवून लोकांची काम करणे गरजेचे असते. कुपवाड ड्रेनेजचा प्रस्ताव आणि शेरीनाल्याचे काम याचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात महापालिकेत बैठक घेऊ. आणखी काही अडीअडचणी समस्या असतील तर त्याही सोडवू. या शहरातील सामान्य माणसं विकासाचा आग्रह धरणारी आहेत. विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर हेही आमच्या सोबत येतील. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ. पण, शेखर इनामदार आणि मकरंद देशपांडे हे मात्र बैठकीसाठी आलेच पाहिजेत. ते आले नाहीत तर मी महापालिकेत येणार नाही.

मी जे काही करतो ते त्यांच्या सहकार्याने, त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवून त्यांनाही बैठकीस बोलवा असे त्यांनी महापौरांना सांगितले. 2008 मध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीत शेखर इनामदार आणि मकरंद देशपांडे यांचाही समावेश होता. या दोघांनाही जयंत पाटील यांनी महत्त्वाची पदे भूषवण्याची संधी दिली होती. त्यामुळे या दोघांवर त्यांचे विशेष प्रेम असल्याचे महापालिकेतील सदस्यांना माहीत होते. आज त्यांनी जाहीर भाषणातूनच त्याची प्रचिती दिली.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com