महापालिकेत लोकांनी ज्यांना निवडून दिले त्यांनी टर्म पूर्ण करावी : जयंत पाटील

विष्णू मोहिते
Thursday, 10 December 2020

महापालिकेत येण्यासाठी मला निमंत्रण मिळाले आहे. वेळ मिळताच मी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत लोकांनी ज्यांनी निवडून दिले आहे. त्यांची त्यांनी टर्म पूर्ण करावी, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर व्यक्त केले. महापालिकेत येण्यासाठी मला निमंत्रण मिळाले आहे. वेळ मिळताच मी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुक प्रचार काळात मंत्री पाटील यांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे नगरसेवक आल्याची चर्चा सुरु होती. त्यावरुन सत्तांतराच्याही चर्चा सुरु झाली होती. याबाबत पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, सांगली महापालिकेत लोकांनी ज्यांना (भाजप) निवडून दिलेले आहे. त्यांनी त्यांची टर्म त्याच ठिकाणी पूर्ण करावी. महापालिकेत पक्षांतराचा विषयच येणार नाही. यासाठी मला कोणीही भेटलेले नाही. महापालिकेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री म्हणून मला भेटीचे निमंत्रण मिळालेले आहे. सध्या मी दौऱ्यांत व्यस्त आहे. वेळ मिळताच मी महापालिकेत जाणार आहे.'

हेही वाचा - मुख्यमंत्री आले कधी, गेले कधी समजलेच नाही -

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक प्रचार काळात मंत्री पाटील यांच्या संपर्कात भाजपाचा एक गट लागल्याची जोरदार चर्चा होती. भाजपचे सात नगरसेवक मंत्री  पाटील यांच्या संपर्कात असून येत्या फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या महापौर निवडीवेळी सत्तातरांची चर्चा जोरदार सुरु झालेली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री पाटील यांनी लोकांनी निवडून दिल्यामुळे ज्यांची त्यांनी टर्म पूर्ण करावी, असे म्हटले आहे. यामुळे मंत्री पाटील स्वतः पक्षांतरासाठी प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्षांत सत्तातराची चर्चा सुरुच राहणार आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant patil said who elected the complete term in sangli municipal corporation in sangli