मदनभाऊ गटाचे मुंबईत गाऱ्हाणे...प्रदेशाध्यक्ष थोरांतांसह नेत्यांशी जयश्रीवहिनींची चर्चा 

घनशाम नवाथे 
Thursday, 16 July 2020

सांगली- कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच आज मदनभाऊ पाटील गटाने मुंबईत कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणे मांडले. मदनभाऊंच्या पश्‍चात नेत्या जयश्री पाटील यांना पक्षाने पाठबळ दिले नसल्याची प्रामुख्याने तक्रार केली. कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्‍वजित पाटील आणि जयश्री पाटील यांच्यात चर्चा झाली. पक्षश्रेष्ठींनी त्यांना पक्ष न सोडण्याचे आवाहन केल्याचे भाऊ समर्थकांनी "सकाळ'ला सांगितले. 

माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा गट पोरका होऊ देणार नाही, अशी ग्वाही देत जयश्रीवहिनींनी राजकारणात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या. मदनभाऊ गटाने त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता, परंतु उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा चार महिन्यांपासून सुरु आहे. राष्ट्रवादीनेही त्यांना आवतन दिले आहे. दोन दिवसांपासून पुन्हा चर्चेला जोर वाढला आहे.

मदनभाऊ गटातून प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद सुरु आहे. त्याचवेळी त्यांनी पक्षातच राहावे यासाठीही काहींनी मनधरणी सुरू केली आहे. या सर्व घडामोडीनंतर पक्षश्रेष्ठींनी जयश्री पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह मुंबई गाठली. आज मुंबईत मदनभाऊ गटातर्फे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर गाऱ्हाणे मांडले. विधानसभेला डावलले. गटाला ताकद न देता सतत अन्यायच केला आहे. त्यामुळेच पक्ष सोडण्याची वेळ आल्याचे स्पष्ट गाऱ्हाणे यावेळी मांडण्यात आले. नेत्या जयश्रीवहिनी यांनीही प्रदेशाध्यक्ष थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री पाटील, राज्यमंत्री कदम यांच्याशी चर्चा केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayashree Vahini's discussion with state president Thorant