आजारी आजोबांचे नातवासाठी कायपण !; पतंगासाठी असाही प्रयत्न

JCB Used To Remove Kite From Wire Human Interest Story
JCB Used To Remove Kite From Wire Human Interest Story
Updated on

तुंग ( सांगली ) - मानवी नाते हे भावभावनांने भरले आहे. ते अमूल्य आहे. मोजता येत नाही. समाजात कल्पनेपलीकडील घटना घडतात. घडतही आहे. कसबेडिग्रज (ता. मिरज ) येथेही असाच एक भावनांचे बंध उलगडणारा प्रसंग घडला.

नाईकबानगरमध्ये करण गोंदकर हा आठ वर्षाचा मुलगा दुपारी साडेचारच्या सुमारास पतंग उडवत होता. अचानक पतंग एका घरावरील तारेत अडकला. आणि करणचा पतंगचा उडवण्याचा खेळ थांबला. त्याने आजोबांना बोलावले आणि सुरु झाली धडपड तारेतून पतंग काढण्याची. घरी आजोबा प्रकाश गोंदकर (वय 65) बसले होते. तेवढ्यात नातवाचा आवाज आला. आजा, पतंग. आजा, पतंग. नातवाचा आवाज ऐकून दुर्धर आजारी आजोबा बाहेर आले. नातवाचा पतंग अडकल्याचे पाहून आजोबांना काय करावे सुचेना. या वयात घरावर चढणे शक्‍य नव्हते. काठीने काढावा तर लाडक्‍या नातवाचा पतंग खराब होईल. फाटला तर नातू पुन्हा रडेल. घरावर चढून काढायला गल्लीत पोरंपण नव्हती. 

ओढ पाहून जेसीबी चालकाचीही मदत

नातवाला आजा, पतंग काढुन देणारच अशी आशा होती. 
तेवढ्यात गल्लीतुन जेसीबी येताना आजोबांना दिसला. अन्‌ "साठी बुद्धी नाठी' अशी हेटाळणी होत असणाऱ्या 65 वर्षीय आजोबांच्या डोक्‍यात जेसीबीने विचारचक्र गतीमान केले. 
त्यांनी जेसीबी थांबवला. नातवाचा पतंग काढण्यास मदत मागितली. विक्रम चव्हाण यांच्या मालकीचा जेसीबीचे चालक सुनिल यांनी नातवाप्रती आजोबाची प्रमे, ओढ पाहून मदत सुरु केली. "नातवासाठी कायपण !' म्हणत आजारी 65 वर्षीय आजोबांनी धाडस करुन जेसीबीच्या समोरील बकेटमध्ये उभे राहून बकेट तारेजवळ नेले. आजोबानी पतंग खराब होणार नाही याची काळजी घेत तो अलगद काढला. आजोबांची धडपड नातू खालुन पाहत होता. अर्ध्या तासाच्या धडपडीनंतर "नातवासाठी कायपण !' म्हणत आजोबानी पतंग त्याच्या हाती सोपवला. जेसीबीचालकाला पैसे किती द्यायचे विचारले. परंतु आजोबा व नातवाचे प्रेम पाहून किंमतीची जागा माणुसकीने घेतली. चालकांने एक पै न घेता आजोबांना सलाम ठोकत कौतुक केले. 
वृद्धाश्रम वाढत असलेल्या जमान्यात नातवाच्या पतंगांसाठी आजोबाची चाललेली धडपड म्हणजे नात्यातील ओलावा व घरातील आजी आजोबाचे नातवाप्रती असलेली ओढ या घटनेतून दिसली. 

तासाभराचा घटनाक्रम

एक तासभराच्या घटनाक्रमात करणला पतंग मिळाल्याचा आनंद, आजोबाचे नातवासाठीचे प्रेम आणि दोघांच्या आनंदासाठी जेसीबी चालकाला खारीचा वाटा उचलल्याचे मिळालेले समाधान जमलेले पाहत होते. विविध घटना, अपघात यांचे फोटो व व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्या परिस्थितीत भावनिक प्रसंगही मोबाईलमध्ये कॅमेराबंद करता येतात हे कसबेडिग्रजच्या बाबासाहेब पाटील यांनी समाजमाध्यमातून दाखवून दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com