गोपनीयरीत्या चोरी प्रकरणाची माहिती मिळाली होती. अल्पवयीन मुलीने शिंदे यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून लोखंडी कपाटाच्या चावीने दरवाजा उघडून आतील कप्प्यातील सोन्या-चांदीचे सुमारे तीन लाख साठ हजार रुपये दागिने चोरी केले होते.
Police recovered stolen ornaments worth ₹3.6 lakh from a minor girl involved in the Ghatnandre village theft case.Sakal
शिरढोण: घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील चोरीचा छडा लावण्यात सांगली येथील स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाला यश आले. अल्पवयीन मुलीकडील सोने-चांदी असे मिळून तीन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.