esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

PhD प्रवेशासाठी 'के. सेट' विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष; 'RCU' पुन्हा चर्चेत

PhD प्रवेशासाठी 'के. सेट' विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष; 'RCU' पुन्हा चर्चेत

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव : अनेक कारणांनी नेहमीच चर्चेत राहणारे राणी चन्नमा विद्यापीठ आता पी. एचडी परीक्षेत 'के. सेट' विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. २०२०-२१ मध्ये पी.एचडी प्रवेशासाठी नेट (जेआरएफ) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठाने प्राधान्य दिले असल्याने 'के. सेट' पास होऊनही पीएचडीसाठी अनेकांना हुलकावणी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न दुरच राहिले आहे.

कर्नाटक विद्यापीठासह राज्यातील काही विद्यापीठात नेट (जेआरएफ), के. सेट व पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश दिला जात आहे. मात्र, राणी चन्नमा विद्यापीठाने के सेट विद्यार्थ्यांना अखेरचे प्राधान्य म्हणून दुर्लक्षीत केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना धक्का पोहचला आहे. फक्त नेट (जेआरफ) उत्तीर्ण झालेल्यांनाच प्राधान्य दिल्याने विद्यापीठातील पीएचडी जागा रिकाम्या आहेत. 'के सेट' विद्यार्थ्यांना जागा मिळत नाहीत. या कारणाने असमाधानी बनलेल्या विद्यार्थ्यांनी आपली कैफियत मांडली आहे. नेट (जेआरएफ), 'के सेट' परीक्षा उत्तीर्ण झालेले पीएचडीसाठी अर्ज दाखल करू शकतात. अशी कर्नाटक विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेशासाठी आधीसुचना जारी केली आहे. मात्र, राणी चन्नमा विद्यापीठात या विद्यार्थ्यांना का डावलत आहे. असा प्रश्‍न 'के सेट'च्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: पुण्यातील तिहेरी हत्याकांड; मसाळकर याची फाशीची शिक्षा कायम

पी. एचडी प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांना सुलभ करून देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गसुची जारी केली आहे. तथापि राणी चन्नमा विद्यापीठाने पीएचडी प्रक्रियेमध्ये कोणताही बदल करत नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विविध विषयात राज्यात 'के सेट' उत्तीर्ण झालले विद्यार्थी अधिक प्रमाणात आहेत. यामध्ये बेळगाव जिल्हा आघाडीवर आहे. त्यामुळे राणी चन्नमा विद्यापीठाने 'के सेट' केलेल्यानाही प्राधान्य द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

हेही वाचा: विट्यातील थरारक घटना ; पत्नीचा पाठलाग करून पतीने काढला काटा

"राणी चन्नमा विद्यापीठात पीएचडीची प्रवेश परीक्षा ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गसुचीप्रमाणेच घेण्यात येत आहे. युजीसीचे नियम पाळणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करतात. त्यांच्या आधारेच त्यांना प्रवेश मिळतो."

- डॉ. रामचंद्रगौडा, कुलगुरु, राणी चन्नमा विद्यापीठ

loading image
go to top