कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणी 600 तक्रारी  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

सांगली - महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगडपर्यंत पसरलेल्या कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात तब्बल 600 तक्रार अर्ज आले आहेत. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाला देण्यात आले आहे. त्याचा सखोल तपास केला जाईल, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  

इस्लामपूर केंद्रस्थान असलेल्या कडकनाथ कोंबडी प्रकरणात तक्रारदारांची संख्या रोज वाढत आहे. लाखो रुपयांची फसवणूक झालेले काही हजार लोक आहेत. कोट्यावधी रुपयांची फसणवूक झाली आहे. आता या कोंबडीचे करायचे काय? कोंबडी खाद्य संपले आहे. अंडीला ग्राहक नाही. कार्यालयांना टाळे आहे. गुंतवलेले पैसे बुडणार, अशी भिती आहे. त्यामुळे काही हजार शेतकरी तरुण अस्वस्थ आहेत. त्यांनी आपले तक्रार अर्ज पोलिसांत दाखल करण्यास सुरवात केली आहे.

या प्रकरणी पोलिस गांभिर्याने तपास करतील, अशी ग्वाही श्री. शर्मा यांनी दिली.  या प्रकरणात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर आरोप केला जात आहे. त्याविषयी विचारले असता, श्री. शर्मा म्हणाले, ""या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सखोल चौकशी करेल. प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही लोकांचा शोध सुरु आहे. त्यानंतर पुढील माहिती समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल.''  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadaknath Hen fraud case 600 complains filed