
कडेगाव : येथील स्थानकामध्ये बसमध्ये जाताना एका महिलेच्या गळ्यातील सुमारे २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरीस गेल्याची घटना घडली. याप्रकरणी कडेगाव पोलिसांत संशयित श्रावण राजेश कांबळे (वय ३३, मलकापूर, ता. कऱ्हाड) याच्यासोबत एका महिलेला कडेगाव पोलिसांनी अटक केली. याबाबतची फिर्याद रोहिणी कैलास सोनताटे (वय ५०, तोंडोली, ता. कडेगाव) यांनी दिली आहे. ही घटना १६ डिसेंबर रोजी घडली असून, शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.