कडेगावात सकल मराठा समाजातर्फे तहसीलसमोर ठिय्या 

संतोष कणसे 
Saturday, 26 September 2020

मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या झालेल्या सकल मराठा समाजातर्फे येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळ भगवामय झाले होते.

कडेगाव : मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या झालेल्या सकल मराठा समाजातर्फे येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळ भगवामय झाले होते. या वेळी आक्रमक झालेल्या आंदोलकानी भगवे ध्वज उंचावत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या व अन्यायाविरोधात आवाज उठविला. 

सकाळी अकरा वाजता मराठा आंदोलक तहसीलदार कार्यालायासमोर आंदोलनस्थळी दाखल झाले. या वेळी आंदोलकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क घालून व सोशल डिस्टन्सिंग ठेऊन शिस्तीचा मानदंड कायम ठेवला. आता समाजाला न्याय मिळेपर्यंत आता माघार घेणार नाही, असा इशारा देत मराठा बांधवांनी अन्यायाविरोधात एल्गार पुकारला. या वेळी तरुण व ज्येष्ठ नागरिकांसह शालेय मुली व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आंदोलकांनी अभिवादन केले. 

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जितेश कदम, मराठा क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक दादासाहेब यादव, इंद्रजित साळुंखे, नगराध्यक्षा नीता देसाई, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष राजाराम गरुड, जगदीश महाडिक, साक्षी महाडिक व गायत्री शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

निवेदन कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांना दिले. या वेळी दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम, मराठा क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक राहुल पाटील, नेताजी यादव, सुनील मोहिते, कृष्णात मोकळे, ऍड. प्रमोद पाटील, अभिजित महाडिक, ज्योती शिंदे, कोमल पवार, अविनाश माने, मंदाताई करांडे, आशिष घार्गे, विजय शिंदे, सुभाष मोहिते, हिंदूराव यादव, इंद्रजित पाटील, सतीश मांडके, विजय मोहिते, सुरेश यादव उपस्थित होते. 

 
संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kadegaon, the Maratha community stood