कडेगावच्या पोलीस निरीक्षकाचा तरुणीवर बलात्कार ; स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याचा बहाणा : जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ 

संतोष कणसे 
Friday, 28 August 2020

कडेगाव (जि.सांगली)- एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन करतो अशी बतावणी करून कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी तरूणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कडेगाव पोलीस ठाण्यात निरीक्षक हसबनीस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

कडेगाव (जि.सांगली)- एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन करतो अशी बतावणी करून कडेगाव पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस याने एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी तरूणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कडेगाव पोलीस ठाण्यात निरीक्षक हसबनीस याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 22 एप्रिल 2020 रोजी लॉकडाऊन असताना पिडीत तरुणी व तिची आजी अशा दोघी कासेगाव (ता.वाळवा) येथे बस थांब्याजवळ थांबल्या होता. हसबनीस याने गणवेशात असताना मोटार थांबवली. पीडितेला कोठे जाणार आहात? याबाबत विचारणा केली. तसेच तिला मदत करणेचे हेतुने लॉकडाऊन कालावधीत तुम्हास वाहन मिळणार नाही, तुम्ही कराडला जाणार असाल तर तुम्हाला सोडतो, असे सांगून गाडीत बसवून घेतले. तसेच कराड येथे सोडेपर्यंत वाटेत पीडितेची सर्व माहिती घेतली.

तिला मदत करण्याच्या बहाण्याने तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर तिला फोन करून कडेगाव येथे बोलावून घेतले. माझी पत्नी तुला एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन करेल अशी बतावणी केली. तसेच संबंधित तरुणीला कडेगाव येथील राहत्या बंगल्यात घेऊन जावून तिचेवर वारंवार अत्याचार केले. तसेच यासंदर्भात पीडितेस पोलीसात तक्रार केलीस तर आत्महत्या करण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. सदरचा गुन्हा 22 एप्रिल ते 25 ऑगस्ट 2020 या कालावधीत घडला आहे. 

पिडीतीने दिलेल्या फिर्यादीनंतर कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शेळके हे तपास करीत आहेत. या बलात्काराच्या घटनेने जिल्ह्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadegaon police inspector rapes girl . excuse to guide for competitive exams