Tembu season begins Sakal
पश्चिम महाराष्ट्र
Tembu season begins : रब्बी हंगामासाठी ‘टेंभू’चे आवर्तन सुरू; ५५ हजार हेक्टर शेतजमिनीला होणार लाभ
Kadegaon News : टेंभू’च्या मुख्य कालव्याद्वारे योजनेचे पाणी लवकरच शिवाजीनगर तलावात पोहोचणार आहे. त्यापुढे मुख्य कालव्यातून हिंगणगाव बुद्रुक तलावात व पुढे खानापूर आटपाडी आणि सांगोल्यापर्यंत जाणार आहे.
कडेगाव : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या टेंभू सिंचन योजनेचे रब्बी हंगामासाठी आवर्तन आज सुरू झाले. त्यामुळे सांगली, सातारा जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यांतील सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.