कणसे होंडातील 43 गाड्या चाेरीचे रहस्य उलगडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

नोव्हेंबर 2019 पूर्वी शोरूमधून होंडा कंपनीच्या विविध मॉडेलच्या 43 गाड्या चोरीला गेल्याचे व्यवस्थापकाच्या निदर्शनास आले होते. अखेर शक्कल लढवून व्यवस्थापनानेच चाेरी उघडकीस आणली.

सातारा : येथील कणसे होंडा शोरूम मधून तब्बल 43 दुचाकी चोरल्याप्रकरणी शोरूममधील कर्मचाऱ्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शशिकांत चांगदेव नलवडे (रा. धनगरवाडी, कोडोली) असे त्याचे नाव आहे. याबाबत शोरूमचे व्यवस्थापक संग्राम संभाजीराव माने (रा. शाहुनगर, गोडोली) यांनी फिर्याद नोंदविली आहे.

नोव्हेंबर 2019 पूर्वी त्यांच्या शोरूममधून होंडा कंपनीच्या विविध मॉडेलच्या 43 गाड्या चोरीला गेल्याचे व्यवस्थापकाच्या निदर्शनास आले होते. शोरूममधून नव्या गाड्या एवढ्या मोठ्याप्रमाणात चोरीला जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. मात्र, चोरी कशा पद्धतीने व कोण करत होते हे समजत नव्हते. त्यमुाळे त्यांनी या गाड्या शोरूममध्ये सर्व्हीसींगला येतात का याचा शोध घेण्यास सुरवात केली.

जरुर वाचा -  सातारा पाेलिस म्हणतात, है तयार हम I
 
उपलब्ध असलेल्या कागदपत्रानुसार त्यांना संबंधीत गाड्यांचे चॅसी व इंजिन क्रमांक माहित होते. त्यामुळे सर्व्हीसींगला येणाऱ्या गाड्यांचे हे क्रमांक तपासण्यास सुरवात झाली. त्यामध्ये एक ग्राहक चोरीला गेलेल्या गाड्यांपैकीच एक सर्व्हीसींगसाठी घेऊन आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती व्यवस्थापकांना दिली. त्यानंतर त्यांनी संबंधीत ग्राहकाकडे वाहनाच्या खरेदीबाबत विचारपूस केली. त्या वेळी शशिकांत नलवडे याने ती गाडी विकल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी शशिकांतकडे चौकशी केली. तेंव्हा त्याने 23 लाख 25 हजार 653 रुपयांच्या तब्बल 43 गाड्या नोव्हेंबर 2019 पर्यंत विकल्याचे समोर आले. त्यानंतर व्यवस्थापक माने यांनी काल रात्री याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. उपनिरीक्षक एन. एस. कदम तपास करत आहेत.

हेही वाचा - साडेचार कोटींच्या दरोड्याचा चार तासांत पर्दाफाश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanase Honda Showroom Management Finally Found The Vehicle Thives Satara Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: