सातारा पाेलिस म्हणतात, है तयार हम I

सातारा पाेलिस म्हणतात, है तयार हम I
Updated on

सातारा : "थर्टी फर्स्ट' जवळ आल्याने अनेक जण बेधुंदपणे वाहन चालविण्याकडे वळत असतात. त्यामुळे अपघात होण्याच्या घटनाही घडत असतात. शिवाय अनेक गुंड अपप्रवृत्तींना खतपाणी मिळत असते. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने जिल्हाभरात दोन दिवसांपासून विशेष मोहीम राबविली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत असल्याने साहजिकच वेगाने, चुकीच्या पद्धतीने वाहन चालवत अपघाताला निमंत्रण देणाऱ्यांना आळा बसणार आहे.

हेही वाचा - साडेचार कोटींच्या दरोड्याचा चार तासांत पर्दाफाश
 
वर्षाअखेर आली, की वेध लागतात, ते "थर्टी फर्स्ट'चे. यामध्ये विशेषत: तरुणाई, हुल्लडबाजी करणारे "राडा' करण्याच्या मानसिकतेत असतात. जोषमध्ये बेहोश होऊन या वेळी कृती केल्या जातात. त्याचा दुष्परिणाम समाजावर होत असतात. बेधुंदपणे वाहन चालविणे, दारू पिऊन वाहने हाकणे, मारहाण करणे हे प्रकार वाढतात. त्यातून खुनाचा प्रयत्न, खून अशा घटना घडतात. त्याला लगाम घालण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या माेहिमेस प्रारंभ झाला असून ती 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत ती सुरू राहणार आहे.

जरुर वाचा - खारुताईची शाळेत धमाल मस्ती
 
विशेष मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दोन हजार 407 वाहनचालकांवर कारवाई करत तब्बल साडेसहा लाखांचा दंड वसूल केला होता. त्यामध्ये साताऱ्यातील वाहतूक पोलिसांनी एक हजार 212 वाहनचालकांवर कारवाई करून तीन लाख 78 हजारांचा दंड केला होता. यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केले जाईल. शिवाय, शासनाच्या तिजोरीत भर पडणार आहे. 

ब्रिथऍनालायझर केवळ चार 

सातारा वाहतूक पोलिसांकडे केवळ चार ब्रिथऍनालायझर असून, शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत त्या कमी पडणार आहेत. दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण "थर्टी फर्स्ट'ला जास्त असले, तरी संबंधित कर्मचाऱ्याकडे हे मशिन नसल्यास त्याची तपासणी होत नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी या मशिन जास्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 


राज्य उत्पादन शुल्क विभाग धाडस दाखविणार ?

दारू पिणे, बाळगण्याचा परवाना असल्याशिवाय दारू पिणे बेकायदेशीर असते. मात्र, "थर्टी फर्स्ट'ला अनेक बिअर बार, दारूविक्री दुकानांमध्ये परवाना नसताना दारू खरेदी करतात, तेथे पित बसतात. अशांवर थेट बार, दारूविक्री दुकानांमध्ये जाऊन कारवाई करण्याचे धाडस राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखविले पाहिजे. अन्यथा हेच दारूच्या नशेत बेदरकारपणे वाहने चालवून अपघातांना नियंत्रण देतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan resort swimming pool accident
Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Marathi News Esakal
www.esakal.com