Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

कऱ्हाड बसस्थानक परिसरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या पती-पत्नीला अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी एक लाख पाच हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करून आणखी तीन गुन्ह्यांचा छडा लावला
Husband and wife arrested for robbery and chain snatching in Karad

Husband and wife arrested for robbery and chain snatching in Karad

Sakal

Updated on

कऱ्हाड ः कऱ्हाड बसस्थानक परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या पती-पत्नीला शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडुन एक लाख पाच हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. संबंधित संशयीतांनी आणखी तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. श्रावण राजेश कांबळे (वय ३३) व त्याची पत्नी पूनम श्रावण कांबळे (वय २७, दोघे रा. कऱ्हाड) अशी अटक करण्यात आलेल्या पती-पत्नीचे नाव असल्याची महिती पोलिस उपाधिक्षक राजश्री पाटील यांनी आज दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com