दिवाळीसाठी मागितली खंडणी! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

कऱ्हाड - दिवाळीसाठी व्यापाऱ्याला वीस हजारांची खंडणी मागण्यासाठी त्याच्या दुकानात जाऊन बसलेल्या दोन खंडणीबहाद्दरांना पोलिसांनी प्रत्यक्ष त्या दुकानात ताब्यात घेतले. येथील सणगर गल्ली परिसरातील एका व्हरायटीज दुकानात सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी थेट छापा टाकून केलेल्या कारवाईने बाजारपेठेत त्याची जोरात चर्चा होती. संबंधित खंडणी बहाद्दर पोलिस रेकॉर्डवरील संशयित आहेत. त्याबाबतची फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती. 

पोलिसांनी सांगितले, की साहित्य विक्रीचे होलसेल विक्रीचे दुकान शनिवार पेठेतील सणगर गल्लीत आहे. या व्यापाऱ्याकडे काही दिवसांपासून संबंधित संशयित खंडणीसाठी येत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्याकडून पंधरा हजार व गणेशोत्सवाच्या काळातही काही खंडणी नेली आहे. त्या वेळी त्यांनी धारदार शस्त्राचा वापर करून व्यापाऱ्याला धमकावले होते. दिवाळीच्या तोंडावर काही दिवसांपासून त्या संबधित दोघांनी त्या व्यापाऱ्याकडे तीस हजारांची खंडणी द्यावी, असा तगादा लावला होता. त्यासाठी ते सातत्याने दुकानात येऊन धमकावत होते. ते सीसीटीव्हीतही कैद झाले आहेत. 

आजही ते दुकानात आले. "आजच्या आज तीस हजार दे. दिवाळी करायची आहे,' असे ते धमकावत होते. "तुला मारण्याची सुपारी मिळाली आहे. एक पेटी दिली, तर तुझी सुपारी वाजविणार नाही; ते परत बघू. आता दिवाळी आहे, ती साजरी करायला वीस हजार रुपये दे,' अशीही मागणी त्यांनी केली. मात्र, व्यापारी व त्याच्या मित्रांनी धाडस करून त्याची माहिती येथील शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस कर्मचाऱ्यांनी थेट दुकानात छापा टाकला. संबंधित दोघे दुकानत सापडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईमुळे बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. त्याची जोरदार चर्चा शहरात होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karad news crime