बिबट्याच्या मुक्त संचारामुळे वाठारमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

परिसरात अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे. नागरी वस्तीत फिरत असलेले दोन्ही बिबटे वनविभागाने लावलेल्या सापळ्यात कधी अडकणार, याची नागरिकांना उत्सुकता आहे

कऱ्हाड - कऱ्हाड तालुक्यातील वाठार येथे गेल्या मंगळवारी वनविभागाच्या जाळ्यात बिबट्याचा बछडा आला. मात्र अद्यापही वाठारच्या नागरी वस्तीलगत पूर्ण वाढ झालेला बिबट्या व एक बछडा आहे. त्यांना पकडण्यासाठी पुन्हा एकदा तेथे सापळा लावला आहे. या बिबट्याच्या येथे होत असलेल्या मुक्त वावराच्या पार्श्वभूमीवर वाठारसह जुजारवाडी परीसर पाच दिवसापासून बिबट्याचे भीतीच्या छायेखाली आहे.

वनविभागाने येथे सक्रिय होवून साळवे व माने यांच्या वस्तीवर सापळा लावला. त्यात दहा महिन्याच्या बछडा सापडला. त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले आहे. मात्र त्या बिबट्यासोबत त्याची आई व अन्य एक बछडा आहे. तो अद्यापही सापडलेला नाही. त्यांना पकडण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.  

दिवसभरात बिबट्याचे दर्शन झालेले नाही. यामुळे परिसरात अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे. नागरी वस्तीत फिरत असलेले दोन्ही बिबटे वनविभागाने लावलेल्या सापळ्यात कधी अडकणार, याची नागरिकांना उत्सुकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karad news: leopard vathar