सत्ताधाऱ्यांच्या यॉर्करवर विरोधकांची विकेट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

कऱ्हाड - मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नगराध्यक्षपदाचे ओबीसी आरक्षण कायम ठेवून "क' वर्ग पालिकेचा दर्जा मिळावा, असा ठराव मासिक बैठकीत केला. ठरावाचा सत्ताधाऱ्यांचा यॉर्करवर कोणाची विकेट पडणार ते येणारा काळच ठरवेल. त्याची राजकीय गोटात चर्चा आहे. मात्र, ओबीसीच्या नगराध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारी खेळी ज्यांनी केली. त्यांना पडद्यामागून भोसले गटाची रसद होती, अशी चर्चा आहे. या निवडणुकीत शह- काटशहाचे राजकारण रंगतदार होणार आहे. 

मलकापूरची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावर राजकीय गणित तापल्याचे दिसते आहे. कर वसुली, नळजोड, भाजीमंडई असे अनेक प्रश्न जिवंत ठेवत त्यावर राजकीय आडाखे बांधण्याचा घाट घातला जातोय. त्यात आता भर पडली आहे ती नगरपंचायतीला "क' पालिका दर्जा देण्याबाबतचा मागणीची. मागणी काय आहे, यापेक्षा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्याचा कसा फायदा करून घेता येईल, याचेच जास्त प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांकडे "क' दर्जाच्या पालिकेची मागणी केली. मात्र, त्याकडे ते लक्ष देत नसल्याचा मनोहर शिंदे व त्यांच्या टीमचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण केले. त्याच वेळी विरोधकांनी बळ एकवटून ओबीसी आरक्षण बदलण्याचा घाट घालून सत्ताधारी "क' दर्जाच्या पालिकेची मागणी करत आहे, असा आरोप करत त्या विरोधात नगरपंचायतीसमोर त्याच दिवशी उपोषण केले. त्यानंतर पालिकेची मासिक बैठक झाली. त्यात ओबीसी नगराध्यक्षपदाच्या मुद्दाच सत्ताधारी गटाने खोडून काढला. ओबीसी नगराध्यक्षपदाला विरोध नाही. ते आरक्षण कायम ठेवून पालिकेला "क' दर्जा द्यावा, अशा मागणीचा ठराव झाला. त्यामुळे विरोधकांचा मुद्दाच हाणून पाडल्यासारखी अवस्था झाली. ठरावद्वारे सत्ताधाऱ्यांनी टाकलेल्या यॉर्करवर नक्की कोणाची विकेट घेणार पडणार, ते काळच ठरवेल. आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या उपोषणाला पडद्यामागून भाजपचाच पाठिंबा आहे, अशी चर्चा आहे. भाजप व अतुल भोसले गटाकडून स्थानिक पातळीवरही सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याला तितक्‍याच ताकदीने प्रत्युत्तर दिले जात आहे. 

विरोधकांना भाजपचे पाठबळ 
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांची मागील वेळी सत्ता आली. त्या वेळी अतुल भोसलेही कॉंग्रेसवासीय होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली. त्याचे परिणाम मलकापूरवरही झाले. कॉंग्रेसवासीय काही नगरसेवक भोसले गटात गेले. त्यांना पक्षांतर बंदीमुळे उघड विरोध नोंदवताही आला नाही. मात्र, आता ते मैदानात आहेत. त्यामागे पाठबळ भाजपचे आहे, असे म्हणण्यास वाव आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karad news malkapur election politics