High-Value Interception: Routine Traffic Check Reveals Financial Hoard
Esakal
कऱ्हाड ः कऱ्हाड शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांने संशयावरून केलेल्या तपासणीत एका सोना-चांदी व्यापाऱ्याच्या ट्रॅव्हल्सवजा वाहनातून सुमारे १५० किलो चांदी व तब्बल ४० लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. या घटनेमुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरु होती. दरम्यान संबंधित चांदीची आणि रोख रक्कमेची पोलिस आणि आय़कर विभागाकडुन पडताळणी सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगीतले.